स्तोत्रसंहिता - अध्याय 87

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
2 परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
3 हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
4 देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात. त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
5 सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
6 देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
7 देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”
← अनुक्रमणिकेकडे परत