स्तोत्रसंहिता - अध्याय 14

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायलाखूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
6
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
← अनुक्रमणिकेकडे परत