स्तोत्रसंहिता - अध्याय 67

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!
2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5 देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7 देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
← अनुक्रमणिकेकडे परत