स्तोत्रसंहिता - अध्याय 127

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल. [6] त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणीत्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
← अनुक्रमणिकेकडे परत