स्तोत्रसंहिता - अध्याय 129

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
2 मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
3 माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
4 पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
5 जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
6 ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
7 ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
8 त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
← अनुक्रमणिकेकडे परत