स्तोत्रसंहिता - अध्याय 3

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
2 बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”
3 परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस तूच माझे वैभव आहेस परमेश्वरा मला महत्वदेणारा तूच आहेस.
4 मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
5 मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
6 माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.
7 परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील.
8 परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.
← अनुक्रमणिकेकडे परत