स्तोत्रसंहिता - अध्याय 47

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.
6 देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7 देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.
← अनुक्रमणिकेकडे परत