स्तोत्रसंहिता - अध्याय 124

123456789101112131415161718192021222324252627282930313233343536373839404142434445464748495051525354555657585960616263646566676869707172737475767778798081828384858687888990919293949596979899100101102103104105106107108109110111112113114115116117118119120121122123124125126127128129130131132133134135136137138139140141142143144145146147148149150
← मागील पुढील →
1 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे.
2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत. जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
← अनुक्रमणिकेकडे परत